मोह नाही, माया नाही, नाही मत्सर वा हेवा, ___रावांचे नाव घेते, नीट लक्षात ठेवा
निळ्या निळ्या नभाखाली, थुई थुई नाचतो मोर, ___रावांसारखे पती मिळाले, भाग्य माझे थोर
पोळ्या देतात भाजून, भाजी देतात चिरून, ___रावांच्या जीवावर, कुंकू लावते कोरून
तीन पानी बेल, तीन पानांचा पळस, ____रावांचे नाव घ्यायला, मला नाही आळस
मधाची गोडी, आणि फुलांचा सुगंध, ____रावांच्या संसारात, गवसला खरा आनंद
कोमेजू नये प्रेम, दरवळो सदा प्रीतीचा सुवास, ___रावांचे नाव घेते, तुमच्यासाठी खास
कपाळाचं कुंकू, जसा पौर्णिमेच्या चंद्राचा ठसा, ___रावांचे नाव घेते, सारे जण बसा
सुख असो, दुःख असो, असो दिवाळी वा पाडवा, ___रावांच्या सहवासात, लाभो सदैव गोडवा
हिवाळ्यात वाजते थंडी, उन्हाळ्यात लागते ऊन, ___रावांचे नाव घेते, ___ची सून
नाव घ्या नाव घ्या म्हणता, नाव तरी काय घ्यायचे, ___रावांना शेवटी, ‘अहो’च तर म्हणायचे