पती म्हणजे सागर, पत्नी म्हणजे सरिता, ___ रावाचं नाव घेते, तुम्हां सर्वांकरिता
वाट जीवनाची, झाली सुखद आनंदी, ___रावांची साथ, मिळाली पदोपदी
प्रत्येक दिवस, प्रेमाने करतो साजरा, ___ राव आणतात मला, सुगंधी मोगऱ्याचा गजरा.
पावसाच्या पहिल्या सरीसाठी, झुरते चातकपक्षाची काया, ___ रावांमुळे मिळाली, सासरी सर्वांची माया
असंख्य तारे, नभात पाहावेत निरखून, ___रावांसारखे पती, वडिलांनी दिले पारखून
चाफा बोलेना, चाफा चालेना, __च माझ्याशिवाय, पानच हलेना
फुलाचा सुगंध, मातीसही लागे, __रावांशी जुळले, जन्मोजन्मीचे धागे
रसाळ कलिंगडाचे, हिरवे हिरवे साल, ___रावांच्या नावाने, कुंकू लावते लाल
भल्या मोठ्या समुद्रात, छोटीशी होडी, ___आणि माझी, लाखात एक जोडी
पिवळं सोनं, पांढरी चांदी, ___ने काढली, माझ्या नावाची मेंदी