नाजूक अनारसे, तळले तुपात, काहीतरी जादू आहे, ___च्या रूपात
गोल गोल गरागरा, फिरतो भोवरा, ___च नाव घेतो, तिचा प्रेमळ नवरा
मनाच्या कप्प्यात, प्रेमाची लेखणी, ___माझी दिसते, सगळ्यात देखणी
मस्त लागते आंबटगोड, संत्र्याची फोड, माझ्या ___ च बोलणं, मधापेक्षाही गोड
लाखात दिसते देखणी, चेहरा सदा हसरा, ___च्या रुपापुढे, रंभा उर्वशीलाही विसरा
चंद्राला पाहून, भरती येते सागराला, ___ची उत्तम साथ, मिळाली माझ्या जीवनाला
पौर्णिमेचा चंद्र, आकाशात दिसतो साजिरा, ___वर शोभून दिसतो, सुगंधी मोगऱ्याचा गजरा
___ आणि माझं नातं, आंबा कैरीची फोड , आंबट वाटलं आधी जरी, पिकल्यावर मात्र गोड
उंदीर राहतो, ती जागा असते बीळ , घायाळ करतो ___च्या, गालावरचा तीळ
दोन शिंपल्यांच्या कुशीत, वाढतो टपोरा मोती, ___ची व माझी, अशीच राहो अखंड प्रीती