संध्याकाळच्या आकाशाचा, पिवळा-केशरी रंग, ___माझी नेहमी, घरकामात असते दंग

चांदीच्या कढईत, सोन्याचा झारा, ___चा स्वभाव, मला खूपच प्यारा

कोकिळेचा आवाज, वाटतो खूपच गोड , ___ला जपतो मी, जसा तळहाताचा फोड

नंदनवनात आहेत, अमृताचे कलश , ___माझी आहे, खूपच सालस

चांदीच्या ताटावर, सोन्याचे ठसे, ___ला पाहून, चंद्र-सूर्यही आनंदाने हसे

नभांगणी दिसे, शरदाचे चांदणे, ___चे रूप, आहे खूपच देखणे

भाजीत भाजी मेथीची, ___माझ्या प्रीतीची

आंब्याला आहे, फळांच्या राजाचा मान, __चे नाव घेतो, ऐका देऊन कान

विवेकानंदांचे स्मारक, कन्याकुमारीच्या सीमेवर, ___रावांचे नाव घेते, मंगळागौरीच्या वेळेवर

ताटभर दगिन्यांपेक्षा, माणसं असावीत घरभर, ___रावांचे नाव घेते, आशीर्वाद असू द्या जन्मभर