नाकात नथ, कानात कुड्या, हातात पाटल्या आणि हिरव्या बांगड्या, पायी पैंजण, बोटात जोडवी, उठून दिसते जरतारी पैठणी साडी, कपाळावर कुंकू, गळ्यात शोभे चंद्रहार, ___ रावांवर माझे, प्रेम आहे फार

चांदीच्या पैठणीला, सोन्याचा काठ, ___चं नाव घेतो, पुढचं नाही पाठ

कपाळावर कुंकू, हिरवा चुडा हाती, ___राव माझे पती, भाग्य माझे थोर किती!

सोन्याचा मुकूट, जरीचा तुरा, ___माझी, कोहिनूर हिरा

अलंकारात अलंकार, मंगळसूत्र मुख्य, ___रावांचा आनंद, हेच माझे सौख्य

नट्टा-पट्टा करून, छान मी सजते, ____रावांचे नाव घ्यायला, भारी लाज वाटते 

शिवाजी महाराजांना जन्म देणारी, धन्य जिजाऊ माता, ___रावांचे नाव घेते, तुमच्या आग्रहाकरिता

पराक्रमाची साक्ष देते, मर्द मराठ्यांची तलवार, ___ रावांचे नाव घेते, करून शिवरायांना नमस्कार

शिवरायांच्या माथ्यावर, भवानी मातेचा हात, ___रावांची आणि माझी, साताजन्माची साथ

किल्ले रायगडाचे, पूर्वीचे नाव होते रायरी, ___ रावांसोबत चढते, सुखी संसाराची पायरी