शिवरायांच्या पराक्रमाची, साक्ष देतो इतिहास, ___रावांचे नाव घेते, तुमच्यासाठी खास

शिवरायांवर होता, भवानी मातेचा हात, ___ ला देईन मी, सात जन्म साथ

पराक्रमाची साक्ष देते, मर्द मराठ्यांची तलवार, ___च नाव घेऊन करतो, शिवरायांना त्रिवार नमस्कार

मर्द मराठे आम्ही, भगवे आमचे रक्त, ___ चे नाव घेतो, मी शिवरायांचा भक्त

शिवाजी महाराज म्हणजे, हिंदवी स्वराज्याच्या पाठीचा कणा, ___राव आणि माझ्यासोबत, सर्वांनी जय महाराष्ट्र म्हणा

छत्रपती शिवाजी महाराज आहेत, अवघ्या महाराष्ट्राची शान, ___रावांचे नाव घेते, ठेवून सर्वांचा मान

गनिमांवर केली शिवरायांनी, पराक्रमाने मात, ___रावांच्या प्रेमाची, मिळो जन्मोजन्मी साथ

शिवाजी महाराज येताच, शत्रू जायचे भीतीने पळून, ___रावांचे नाव घेते, सर्वांनी बघा पाहू इथे वळून

शब्द कमी पडतील एवढी, शिवरायांची कीर्ति आहे, ___रावांसोबत पतीच्या आधी, एक प्रेमळ मैत्री आहे

शिवरायांचे मावळे आम्ही, नाही कुणाची भीती, ___ आणि माझी आहे, जन्मोजन्मीची प्रीति