शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकला, शक्ती पेक्षा युक्ती ने, ___रावांच नाव घेते, मनापासून भक्तीने

हिंदवी स्वराज्य स्थापन केले, छत्रपती शिवाजी महाराजांनी, ___ आणि माझ्या संसाराची सुरुवात, करतो तुमच्या आशीर्वादांनी

रायगडावर घेतले, मी शिवरायांचे दर्शन, ___रावांच्या प्रेमासाठी, सर्वस्व केले अर्पण

सौख्याच्या वाऱ्यासंगे, आनंद मेघ आले, __रावांच्या संसारात, मी अमृतात न्हाले

मोगऱ्याचा गजरा, गुलाबाचा हार, __रावांच्या रूपात भेटला, मला उत्तम जोडीदार

करवंदाची साल, चंदनाचे खोड, ___रावांचे बोलणे, अमृतापेक्षा गोड

जंगलात जंगल, ताडोबाचं जंगल, __रावांच्या संसारात, सर्व राहो कुशल-मंगल

स्वप्नातला राजकुमार, आला घोड्यावर बसून,  __रावांचे नाव घेते, त्यांच्याच बाजूला बसून

चांदीच्या किचन मध्ये, सोन्याचा ओटा, __सोबत असताना, नाही आनंदाला तोटा

गुलाबाच्या फुलांपेक्षा, नाजूक दिसते शेवंती, __रावांना मिळो दीर्घायुष्य, हीच देवाला विनंती