सासर आहे छान, सासू आहे हौशी, ___रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी
सर्वजण एकत्र जमलो, म्हणून आजचा दिवस खास, ___रावांचे नाव घेण्याची, लागली मला आस
सासूबाई आहेत सुगरण, सासरेबुवा आहेत हौशी, ___चे नाव घेते, ___ पूजेच्या दिवशी
नैवेद्याचे ताट, रांगोळीने खुलले, ___च्या संसारात, भाग्य माझे फुलले
चांदीच्या ताटात वाढले आहे, भात आणि वरण, ___रावांचे नाव घ्यायला, ___पूजेचे कारण
उखाणे घेऊन स्त्रियांच्या, सुप्तगुणांना मिळतो वाव, ___च्या पूजेला, ___रावांचे घेते मी नाव
पाण्याने भरला कलश, त्यावर आंब्याची पाने फुले, ___चे नाव घेताना, चेहरा माझा खुले
नटण्या-सजण्यामध्ये, बायका असतात खूपच हौशी, ___चे नाव घेतो, ___च्या दिवशी
कधीच नाही पडले, चिंतेचे ऊन, सासूबाईंनी घेतले, नेहमीच मला समजून
आई सारखी मिळाली, प्रेमळ सासू, या वयातही दिसते एकदम ढासू