जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, __रावांचे नाव घेते, पत्नी या नात्याने

गीतात जसा भाव, फुलांत जसा सुगंध, __रावांमुळे मिळाला, मला भरभरून आनंद

आकाशात शोभतो, इंद्रधनुष्याचा पट्टा, __रावांचे नाव घेते, पुरे आता थट्टा  

यमुनेच्या काठी, ताजमहाल प्रेमाचा, __रावांचे नाव घेते, मान राखून सर्वांचा

कळी हसली, फूल फुलले, मोहरून आला सुगंध, __रावांमुळे जीवनात, बहरून आलाय आनंद

कुंकू लावते ठळक, हळद लावते किंचित, __राव झाले पती, हेच माझे पूर्वसंचित

प्रेमाच्या रेशीम धाग्यांनी, सौख्य मी विणले, __रावांच्या साथीने, जीवनपुष्प बहरले

नाजूक अनारसा, साजूक तुपात तळावा, __ रावांसारखा पती, जन्मोजन्मी मिळावा

प्रेमाच्या छायेत, आयुष्य घेते विसावा, __रावांचे नाव घेते, आपला आशीर्वाद असावा

मंगळसूत्रातील दोन वाटया, सासर आणि माहेर, __रावांनी दिला मला, सौभाग्याचा आहेर