साजूक तुपात, नाजूक चमचा, __रावांचे नाव घेते, द्या आशीर्वाद तुमचा

आम्हा दोघांची, स्वर्गात बांधली गाठ, _____रावांचे नाव मला, अगदी तोंडपाठ

आशीर्वादाची फुले, वेचावीत वाकून, __रावांचे नाव घेते, तुमचा मान राखून

जाई च्या वेणीला, चांदीची तार, ___माझी म्हणजे, लाखात एक नार

हत्तीच्या अंबारीला, मखमली झूल, ___माझी नाजूक, जसे गुलाबाचे फूल

ऊस आहे गोड, बर्फ आहे थंड, ___समोर माझ्या, सोनं सुद्धा लोखंड

जुईच्या वेलीवर लागली, सुगंधी नाजूक फुले, ___ ने दिली मला, दोन गोड  मुले 

डाळीत डाळ, तुरीची डाळ, ___च्या मांडीवर खेळवीन, एका वर्षात बाळ

द्राक्षाच्या वेलीला, त्रिकोणी पान, ___चे नाव घेतो, ऐका देऊन कान

केशर-दुधात टाकले, काजू, बदाम, जायफळ, ___चं नाव घेतो, पिडू नका वायफळ