बाहेरच्या जेवणाने पोट बिघडून, व्हायचे आधी जागरण, आता मी खुश, पोटही खुश ___ निघाली सुगरण
गालावर खळी, डोळ्यात धुंदी, __मुळे झाले, आयुष्य सुगंधी
चंद्रामुळे येते, विशाल सागराला भरती, __च्या नुसत्या हसण्याने, सारे श्रम माझे हरती
कावळा करतो काव काव, चिमणी करते चिव चिव, __चे नाव घेतो, बंद करा टिव टिव
चांदीच्या पैठणीला, सोन्याचा काठ, __चं नाव घेतो, पुढचं नाही पाठ
गुलाबी प्रेमाने बनला, प्रेमाचा गुलकंद, __च्या नावातच, सामावलाय माझा आनंद
गोड गोड पुरणपोळीवर, घ्यावे भरपूर तूप, __वर माझे, प्रेम आहे खूप खूप
पाहताक्षणी चढली, प्रेमाची धुंदी, __मुळे झाले, जीवन सुगंधी
मधाची गोडी आणि फुलांचा सुगंध, __मुळे कळला मला, जीवनाचा आनंद
प्रेमाच्या ओलाव्याने, दुःखं कोरडी झाली, __माझ्या जीवनी, चांदणे शिंपीत आली