एक दोन तीन चार, ____वर आहे, माझे प्रेम फार
सोन्याच्या कपावर, चांदीची बशी, __समोर फिक्या पडतील, रंभा आणि उर्वशी
डोळ्यावरची बट, दिसते एकदम भारी, __माझी झाल्यापासून, जळतात बघा सारी
हिरवी नेसली साडी, भरला हिरवा चुडा, ___रावांचे नाव घेऊन, शोधते बर्फी की पेढा
घाट घातला तुम्ही, पुरवायला माझे प्रेमळ डोहाळे ___रावांच्या प्रेम झुल्यावर, घेते मी हिंदोळे
नीलवर्णी आकाशातून, पडती पावसाच्या सरी, ___चे नाव घेते, ___च्या घरी
पूजेच्या नावाखाली फांद्या तोडणं, पटत नाही मनाला, ____रावांच्या दीर्घायुष्यासाठी, मनातच स्मरते वडाला
पूजेकरिता जमविल्या, नानविध पत्री, ___रावांचे नाव घेते, मंगळागौरीच्या रात्री
मोहरली माझी काया, लागता नवी चाहूल, ___रावांचे नाव घेते, जड झाले पाऊल
___च्या उत्सवाला, आली खूपच धमाल, ___रावांच्या कल्पकतेची, आहे सगळी कमाल