मंथ एन्ड आला की, भरपूर वाढते काम, ऑफिस मध्ये बॉस आणि घरी __ कटकट करते जाम

__च्या दर्शनाला लागतात, लांबच लांब रांगा, __रावांचे नाव घ्यायला, मला कधीही सांगा 

काय बाई सांगू, कसं ग सांगू, मलाच माझी वाटे लाज, __नी वजन काटा मोडलाय आज

झाले आता वय, जवळ आली साठी,  शंभरी नक्की गाठेन, __चे प्रेम असता पाठी

बाळाच्या आगमनाने, दरवळला परिसर, ___ रावांच्या सहवासात, जीवन होईल सफल

भरजरी साडी, जरतारी खण, ___रावांचे नाव घेते, आहे___चा सण

ढीगभर चपात्या, किती पटापट लाटतेस, __तू मला, सुपरवूमन वाटतेस

वरुणराजा वरुणराजा, पाऊस येऊ दे  जोरात, ___रावांचे नाव घेते, ___च्या घरात

पतीच्या दीर्घायुष्यासाठी, नका करू वडाची कत्तल, ____रावांची शप्पथ, निसर्ग घडवेल तुम्हाला अद्दल

लग्नानंतर पहिली मंगळागौर, साजरी करते प्रेमाने, ___रावांचे नाव घेते, फुगडी घालून जोमाने