हिरव्यागार रंगाने, श्रावणात सुष्टी सजली, ___रावांच्या नावाने, मी मंगळागौर पुजली
सूर्याच्या किरणांनी, उगवली पहाट, __रावांमुळे झाली, सुखकर प्रत्येक वाट
झुळूझुळू पाण्यात, हळू हळू चाले होडी, शोभून दिसते सर्वांमध्ये, __ व माझी जोडी
दीन दुबळ्यांचे गाऱ्हाणे, परमेश्वरानी ऐकावे, ___रावांसारखे पती मिळाले, आणखी काय मागावे?
चहा गरम राहावा म्हणून, कपावर ठेवली बशी, __माझी गरीब गाय, बाकी सगळ्या म्हशी
केस झाले पांढरे, तरी मिशी अजून काळी, माझ्या संसारवेलीचे __राव माळी
यमुनेच्या पाण्यात, ताजमहालाचे पडते प्रतिबिंब, ____चे नाव घेण्यास, कशाला करू विलंब?
हिरव्या हिरव्या जंगलात, उंच उंच बांबू, मी आहे लंबू आणि __ किती टिंगू
गोंडस बाळ व्हावे म्हणून, केला आम्ही नवस, ___ रावांच्या मुलीचा, आज बारश्याचा दिवस
___च्या दिवशी, दारावर बांधले तोरण, ___रावांचे नाव घ्यायला, कशाला हवे कारण?