कधीही फोन केलात तरी, लाईन लागेल व्यस्त, _च्या प्रेमात, मी बुडलोय जबरदस्त

मंगळागौरीला खेळते, खेळ मी नवे, ____ रावांच्या साथीने, सुखी जीवन मला हवे

बनारसी शालूला, आहेत जरतारी काठ, ___च्या मुलीच्या बारश्याचा, केला मोठा थाट

मोगऱ्याचा सुगंध, पावसाळ्यातील मृदगंध, __शी जुळले आता, रेशमी ऋणानुबंध 

तुरीच्या डाळीला, जिऱ्याची फोडणी, बघताक्षणी प्रेमात पडलो, __ ची लाल ओढणी

__मुळे झाली माझी, सेकंड इनिंग सुरु, हसत खेळत आम्ही आता __टूर करू   

हिरवाईचा शालू नेसून, येतो श्रावण महिना, ____रावच आहेत, माझा खरा दागिना

वटपौर्णिमेचे व्रत करते, सत्यवान-सावित्रीला स्मरून, ____रावांसाठी दीर्घायुष्य मागते, वडाला नमस्कार करून

सीतेसारखे चारित्र्य, रंभेसारखे रूप,  ___च्या सोबत, मी आनंदी आहे खूप 

नव्या कोऱ्या रुळांवर, ट्रेन धावते एकदम फास्ट चल ___ पिक्चरला, सीट पकडू लास्ट