पूजते मंगळागौरीला, खेळ खेळते नवे नवे, ____राव पती म्हणून, जन्मोजन्मी हवे हवे!
काऊ चिऊचे घास, प्रेमाने भरवायची आई, __मुळे कानी पडू लागली, परत नव्याने अंगाई
कपाळाचं कुंकू, जसा सूर्याचा ठसा, ___रावांचे नाव घेते, सारे जण बसा
शिवाजी महाराज आहेत, स्वराज्याचा हिरा, ___ रावांचे नाव घेऊन, उखाणा करते पूरा
वटपौर्णिमेचे व्रत, निष्ठेने करते, ____रावांसाठी मी, दीर्घायुष्य मागते
श्रावण महिन्यात, सृष्टी होते हिरवी, ____रावांची गाते, मी उखाण्यातून थोरवी
ती आली की, पैंजण छुम-छुम वाजते, ____माझी, कित्ती गोड लाजते
___ च्या आशीर्वादाने, आला भाग्याचा दिवस, ___रावांसाठी, मी केला होता नवस
जनतेच्या हक्कासाठी, मी सरकारशीही लढेन, ___ला सुखी ठेवण्यासाठी, मी काहीही करेन
माहेरच्या आठवणीने, डोळे झाले ओले, __रावांच्या प्रेमाने, अश्रूंची झाली फुले