__ची लेक झाली, __ ची सून, __ च नाव घेते, गृहप्रवेश करून!
मौजमजेने भरला, दिन हा __चा, __रावांना घास देते, गोड गोड __चा
वय झालं, टक्कल पडलं, पोटही सुटलं , __वरचं प्रेम तरी, अजिबात नाही आटलं
लिपस्टिक वाढवते ___ची ब्यूटी, त्याची टेस्ट घेणं, ही माझी आवडती डयुटी
___पुढे मांडले, प्रसादाचे ताट, ___मुळे मिळाली माझ्या, आयुष्याला वाट
बेचव लाईफ झाले टेस्टी, प्रेमाची मजा चाखून, __शी तासंतास गप्पा मारतो, अनलिमिटेड प्लॅन टाकून
पैठणीवर शोभे, नाजूक मोरांची जोडी, __मुळे आली, माझ्या आयुष्याला गोडी
लहान-सहान गोष्टींनीही, आधी व्हायचो त्रस्त, __आल्यापासून झालंय, आयुष्य खूपच मस्त!
हातावरची मेंदी देते, आयुष्याला अर्थ नवा, ____रावांचे नाव घेते, सदा तुमचा आशीर्वाद हवा
शिवनेरी किल्ल्यावर झाला, शिवरायांचा जन्म, ___रावच पती मिळावेत, मला सातही जन्म