पतिव्रता धर्माचा, सावित्री आहे आदर्श, ____ रावांचे नाव घेताना, होतो खूपच हर्ष
श्रावणात येते, सुंदर पर्जन्यधारा, ___रावांचे नाव घेते, ___ आहे घरा
हातात हिरवा चुडा, गळ्यात शोभते ठुशी, ___रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी
सायंकाळचे वेळी, नमस्कार करते देवाला, ___रावांचे नाव घेताना, आनंद होतो मनाला
भल्याभल्यांचे ज्यांच्यशिवाय, हलत नाही पान, अशा __रावांना मिळो, चोहीकडे मान
__व __च्या लग्नाकडे, डोळे लागले जगाचे, आहेरात आणा फक्त, अनमोल गिफ्ट आशीर्वादाचे
चांदीची जोडवी, सौभाग्याची खूण, ___रावांचे नाव घेते, ___ची सून
___ आहेत प्रेमळ, नाही कोणाचा द्वेष, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, करते गृहप्रवेश
संसारात प्रेमाला हवी, विश्वासाची जोड, __रावांचे नाव घेते, __भरवून गोड
__ च्या गोळ्या घेऊन, तोंड होते कडू, __इतकी गोड जणू, मऊ बेसनाचा लाडू