__ची बाटली आणि काचेचे ग्लास, __ सोबत असताना, क्वार्टर होते लगेच खल्लास

___पुढे ठेवल्या, फुलांच्या राशी, ___रावांचे नाव घेते, ___ च्या दिवशी  

दिसते इतकी गोड, की नजर तिच्याकडेच वळते, __च्या एका स्माईल ने, दिवसभराचे टेन्शन पळते

हिरव्या हिरव्या साडीचा, पिवळा काठ जरतारी, __ रावांचे नाव घेताच येई, चेहऱ्यावर तरतरी

गोऱ्या गोऱ्या गालावरती, तीळ काळा काळा, __च्या गोड हास्याचा, मला लागलाय लळा  

शिवरायांचे पराक्रम लिहायला, पुस्तकं पडतील कमी, ___ला सुखी ठेवण्याची, देतो मी हमी

वटपौर्णिमेला आहे, वडाला खूपच महत्त्व, ____रावांची वाढत राहो, कीर्ती आणि कर्तृत्व

श्रावणानंतर वाजतगाजत, येतात गौरी गणपती, ___राव आहेत, खूपच प्रेमळ पती

नव्या नवरीला शोभतो, हिरव्या बांगड्यांचा चुडा, ___ व माझा, आज आहे साखरपुडा

कण्वमुनींच्या आश्रमात, शकुंतलेचे माहेर, ___रावांनी दिला मला, सौभाग्याचा आहेर