अत्तराचा सुगंध, दरवळला चहूकडे, __रावांची कीर्ती, पसरू दे सगळीकडे
लग्नकार्य म्हणजे, सुख-आनंदाची सभा, तुमच्या येण्यानं वाढेल, समारंभाची शोभा
बरसला पाऊस, दरवळली माती, __रावांसोबत, फुलली नवीन नाती
सासरी आले तरी, माहेरचे विसरता येत नाही अंगण, ___रावांचे नाव घेऊन, सोडते मी कंकण
जरतारी पैठणीवर शोभे, कोल्हापुरी साज, __च नाव घेऊन, गृहप्रवेश करते आज
सुख-समाधान असेल, तिथे लक्ष्मीचा वास, __रावांना देते, मी __चा घास
म्हातारपणी काठी बनली, माझी साथीदार, __मुळे मिळाला माझ्या, जीवनाला आधार
गोव्यावरून आणले, खास फेणी आणि काजू, __चा पापा घ्यायला, मी कशाला लाजू?
___च्या समोर, ठेवले केशरी पेढे, ___रावांचे नाव घ्यायला, कसले हो आढे-वेढे ?
सकाळी पिझ्झा, दुपारी बर्गर, ___आहे, माझ्या Life चा Server