आग्रहाखातर नाव घेते, आशीर्वाद द्यावा, __ रावांचा सहवास, आयुष्यभर लाभावा
ती सोबत असली की, खराब मूड होतो बरा, __मुळे कळला, जगण्याचा आनंद खरा
वाट जीवनाची, झाली सुखद आनंदी, ___ रावांच्या सोबत, चालले मी सप्तपदी
ताठ होतील माना, उंच होतील नजरा, __ व माझ्याकडून शिवरायांना, करतो मानाचा मुजरा
रामाने सीतेसाठी, उचलले शिवधनुष्य, ____रावांसाठी मागते, देवाकडे दीर्घायुष्य
मेघ मल्हार रंगातच, श्रावणसर कोसळते, __ च्या नावाने माझे, जीवनपुष्प बहरते
सोन्याची अंगठी, चांदीचे पैंजण, __ रावांचे नाव घेते, ऐका गुपचूप सर्वजण
रुक्मीणीने पण केला, कृष्णालाच वरीन, __ रावांच्या साथीनं, आदर्श संसार करीन
यंदाच्या निवडणुकीत, आमच्या __ पक्षाचा सूर, __राव म्हटल्यावर येणार, मतांचा महापूर
__व __ची जुळणार, जन्मोजन्मीची नाती, उपस्थित राहून उधळा, आपल्या आशीर्वादाचे मोती