माहेर सोडताना, पावलं झाली कष्टी, __रावांच्या संसारात, करेन सुखाची वृष्टी
खमंग चिवड्यात घालतात, खोबऱ्याचे काप, __ रावांचे नाव घेऊन, ओलांडते मी माप
घरात दरवळला, अत्तराचा सुवास, ___ ला भरवते, ___चा घास
हसत खेळत संसाराची, वर्षे सहज लोटणार, __सोबत मी वयाची, शंभरी गाठणार
हँगओव्हर उतरवायला, उपयोगी पडते लिंबू, ___ एवढी हॉट असताना, ऑफिस मध्ये कशाला थांबू?
___च्या समोर, फुलांचे सडे, ___रावांचे नाव घ्यायला, मी नेहमी पुढे!
इस्त्री केल्यावर, कॉलर राहते एकदम ताठ, माझ्या__चे केस सिल्की, बाकी सगळ्यांचे राठ
संसाराच्या सागरात, प्रेमाच्या लाटा, __ रावांच्या सुखदुःखात, माझा अर्धा वाटा
एका वर्षात, महिने असतात बारा, __मुळे वाढलाय, आनंद सारा!
घातली मी वरमाला, हसले ___राव गाली, थरथरला माझा हात, लज्जेने चढली लाली