लग्न लागले, घातले मंगळसूत्र, ___रावांसोबत, सुरु झाले नवे सत्र
शिवरायांच्या राज्यात, सुखी होती प्रजा, ___रावांच्या संसारात, मला येते खूपच मजा
वडाच्या झाडाला घातल्या, प्रदक्षिणा एकशे आठ, ____रावांसोबत बांधली, मी जन्मोजन्मीची गाठ
श्रावणात आकाशात, कडकडतात विजा, __रावांसोबत करते, __ची पूजा
नको मला हिरे-माणके, नको आकाशातील तारे, ___ हेच माझ्या, जीवनाचे अलंकार खरे
मनाच्या गाभाऱ्यात, __ची मूर्ती, अशीच वाढत राहो देवा, __रावांची कीर्ती
__आणि__चे जुळले आता सूर, तुमच्या येण्यानं होईल, आनंद भरपूर!
नव्या नव्या संसाराचा, नाजूक-गोड अनुभवही नवा, __राव व माझ्या संसाराला, तुमचा अखंड आशीर्वाद हवा
हिरव्या हिरव्या जंगलात, झाडी घनदाट, __रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट
प्रेमाला नसते मोजमाप, नसते लांबी रुंदी, आज भरवते__ला, गोड गोड बासुंदी