बघता बघता संसाराची, ___वर्षे लोटली, ___च्या सोबत मोठी संकटेही, सुपारी समान वाटली
बाजारातून घेऊन येतो भाजी ताजी ताजी, __शी गुलूगुलू करायला, मी नेहमीच राजी
___च्या पूजेने करू, नवीन कार्याची सुरवात, ___रावांचे नाव घेऊन, देवापुढे लावते फुलवात
Facebook वर ओळख झाली, आणि WhatsApp वर प्रेम जुळले, ___ आहे कित्ती बिनकामी, हे लग्नानंतर कळले
संसाराच्या सागरात, प्रेमाची होडी, __रावांमुळे आली, माझ्या आयुष्याला गोडी
प्रेमाच्या चौकात, किती पण फिरा, शोधून नाही सापडणार, ___सारखा हिरा
कलियुगात अवतरली, सत्य व अहिंसेची मूर्ती, __रावांची वाढो, सर्वदूर कीर्ती
जातीभेद नाही केला, कधी आमच्या शिवरायाने, ___रावांसोबत सुखाने नांदते, तुमच्या आशीर्वादाने
वडाची पूजा करून, मागितले दीर्घायुष्याचे दान, ____रावांसोबत, मी संसार करीन छान
श्रावणाच्या आगमनाने, बहरली कांती, __रावांच्या संसारात, मिळो सुखशांती