चित्रपटात सासू करते, नेहमीच सूनेचा छळ, जरा त्रास दिला मी तर, काढा की थोडी कळ

माहेर सोडलं मायेचं, आता रडू की हसू, आई सारख्या मायेची, लाभली मला प्रेमळ सासू

कोकणची ओळख, आहे हापूस आंबा, सासू माझी दिसते, सेम टू सेम जगदंबा

इंग्रजीत चंद्राला, म्हणतात ना हो मून, घोडचूक केली मी, होऊन ____ ची सून

सोन्याच्या वाटीत, खोबऱ्याचा कीस, सुना आम्ही छान, आणि सासू ४२० 

इतकी छान सासू मिळाली, भाग्य माझे थोर, संसाराच्या IPL मध्ये, आता रोजच सिक्स आणि फोर

प्रेमळ सून लाभता, मिळाली सुखी संसाराची हमी, ___चे कौतुक करताना, मला शब्दही पडती कमी

यमुनेच्या पाण्यात पडली, ताजमहालाची सावली, ____रावांची जन्मदात्री, धन्य ती माऊली

राहतो आम्ही प्रेमाने, पूनव असो वा अवस, ___रावांचे नाव घेते, बघून ___चा दिवस

निसर्गरूपी आकाशाला, सूर्यरूपी माळी, ___रावांचे नाव घेते, ___च्या वेळी