नील नभाच्या तबकात, नक्षत्रांचा हार, ___रावांचा स्वभाव, आहे फारच उदार
तुमचा आशीर्वाद राहो, सदैव आमच्या पाठी, नक्की या जुळताना, ___ आणि __ च्या रेशीमगाठी
नवे घर, नवे लोक, नवी नवी नाती, संसार होईल मस्त, __राव असता सोबती
लग्न झाले आता,आमची बहरू दे संसारवेल, __ रावांचे नाव घेते, वाजवून __च्या घराची बेल
__च्या दिवशी, फुलांची आरास, __ रावांना भरवते, __ चा घास
प्रेमाच्या टॉनिकने होई, तब्येत लगेच बरी, __ मुळे कळली मला, जगण्याची जिद्द खरी
उखाणा घ्या म्हटलं की, उखाणा काही सुचत नाही, कोणाकोणाचं नाव घेऊ, माझंच मला कळत नाही
___ची पूजा, मनोभावे करते, ___रावांसाठी, दीर्घायुष्य मागते
रोज ___म्हणून, सारखी नावाने हाक मारतेस, मग उखाणा घेताना ___, कशाला गं खोटे खोटे लाजतेस?
चांदीच्या वाटीत, सोन्याचा चमचा , ___रावांचे नाव घेते, द्या आशीर्वाद तुमचा