राधेला बघून, कृष्णाने वाजविली बासरी, __रावांच्या प्रेमामुळे, सुखाने नांदते सासरी

प्रेम म्हणजे, दोन मनांना जोडणारा पूल, __च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला भूल

__रावांचे सुख, हाच माझा अलंकार, येत्या निवडणुकीत होवोत, सर्व स्वप्ने साकार

दशरथ राजाला, पुत्र होते चार, ____रावांनी घातला, मला मंगळसूत्राचा हार

छत्रपती शिवाजी महाराजांनी, तयार केले मजबूत राष्ट्र, ___ आणि माझ्याकडून सर्वांना, जय हिंद, जय महाराष्ट्र

वटवृक्ष सांगतो, सत्यवान-सावित्रीचा इतिहास, ____रावांचे नाव घेते, वटपौर्णिमेसाठी खास

भर श्रावणात, पाऊस आला जोरात, __रावांचे नाव घेते, __च्या घरात 

छन छन बांगड्या, छुम छुम पैंजण, ___रावांचे नांव घेते, ऐका पाहू सारे जण

गोकुळच्या वनात, कृष्ण वाजवितो बासरी, __रावांच्या प्रेमामुळे, सुखी आहे मी सासरी

सावन का महिना, पवन करे शोर, मतदान करा __रावांना, बाकी सगळे आहेत चोर !!