लग्नामुळे जुळतात, सासर आणि माहेर, तुमचा प्रेमळ आशीर्वाद, हाच आमचा आहेर

नव्या नव्या आयुष्याची, नवी नवी गाणी, __माझा राजा आणि मी त्याची राणी

सीमेवर लढतात सैनिक, म्हणून शांत झोपतो आपण सर्व, ___ राव आहेत आर्मीत, याचा मला खूपच गर्व

उंबरठ्यावरती माप देते, सुखी संसाराची चाहूल, __च्या जीवनात टाकले मी, आज पहिले पाऊल

संसाराच्या गणिताचे, सुरु झाले पाढे, __च नाव घेऊन, भरवते मी पेढे!

नाते जुने झाले तरी, रंग अजूनही ताजाच आहे, __सोबत असताना, प्रत्येक दिवस मजाच आहे

बायकोपेक्षा बाकी पोरी, वाटतात गोड गोड, ___ रावांना डोळे मारण्याची, फार जूनी खोड 

___समोर ठेवल्या, पंचपक्वान्नाच्या राशी, ___ रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी

तिची नि माझी केमिस्ट्री, आहे एकदम वंडरफूल, __ माझी आहे, खरंच कित्ती ब्युटीफुल!

केळीच्या पानांवर, कोवळं कोवळं ऊन, ___रावांचे नाव घेते, ___ची सून