आकाशात उडतोय, पक्ष्यांचा थवा, __ च नाव घ्यायला, उखाणा कशाला हवा!
पूजेच्या साहित्यात, उदबत्तीचा पुडा, ____रावांच्या नावाने, भरला सौभाग्याचा चुडा
स्वातंत्र्याच्या होमकुंडात, वीरांनी मारली उडी, ___रावांच्या नावाने, घातली मंगळसूत्राची जोडी
शिवाजीसारखा पुत्र, धन्य जिजाऊची कुशी, ___ चं नाव घेते, ___च्या दिवशी
तीन वर्षांतून एकदा, येतो अधिकमास, ____रावांसाठी ठेवला, मी वटपौर्णिमेचा उपवास
श्रावणात बरसल्या, धुंद जलधारा, __रावांमुळे फुलला, संसाराचा फुलोरा
नऊवारी साडीवर, शोभून दिसते ठुशी, ____रावांचे नाव घेते, ____च्या दिवशी
शंकराच्या पिंडीवर, बेलाचे पान, __रावांचे नाव घेते, राखून सर्वांचा मान
__ ला जाताना लागतो, __ चा घाट, अख्ख्या गावात नाही, __ रावांसारखा थाट
आग्रहाचे निमंत्रण करतो, बघण्या फेरे सात, __आणि__वर असू द्या, आशीर्वादाचा हात