संसाररुपी पुस्तकाचे, उघडले पहिले पान, __ रावांचे नाव घेते सर्वांचा राखून मान

आमच्या दोघांचे स्वभाव, आहेत Complementary,  __ रावांचे नाव घेऊन करते, घरात पटकन Entry

छोट्या टेकडीवर बांधले, मोठे फार्म हाऊस, घास भरवतो ___, बोटं नको चावूस

वयामुळे थकले अंग, तरीही मन ताजे,  __माझी राणी आणि आम्ही तिचे राजे

हिरव्या हिरव्या साडीला, भरजरी काठ, ___रावांच्या खोड्या सुरु, जरा वळली की पाठ  

आला आला ___चा, सण हा मोठा, ___राव असताना, नाही आनंदाला तोटा  

बटाट्याच्या भाजीत घातला, एकदम Tasty मसाला, ___च नाव माहितेय तरी, मला विचारता कशाला?

सुगंधात न्हाल्या, दिशा धुंद दाही, __ रावांचे नाव, हळूच ओठी येई

आकाशाच्या पोटात, चंद्र, सूर्य, तारांगणे, __ च नाव घेतो, तुमच्या म्हणण्याप्रमाणे

लग्नात घातले, हार आणि तुरे, ____रावांचे नाव घेते, चिडवणं आता पुरे