स्वतंत्र भारताची, तिरंगा वाढवितो शान, ___चे नाव घेतो, ठेवून सर्वांचा मान

___च्या किल्ल्यावर ठेवल्या, शिवरायांनी फौजा, __रावांच्या जीवावर, करते मी मौजा

वटवृक्षामुळे, शोभून दिसतो निसर्ग, ___राव सोबत असताना, धरतीही वाटे स्वर्ग

श्रावणात येई, पावसाला जोर, __राव भेटायला लागते, भाग्य खूपच थोर

कानी कुड्या अन हातात पाटल्या, ____रावांच्या नावानेच, प्रेमभावना मनी दाटल्या

शंकराला बेल, विष्णूला तुळस, __रावांचे नाव घ्यायला, कसला हो आळस!

नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री,  ___झाली, आज माझी गृहमंत्री

__ आणि __ ची जमली आता जोडी, लग्नाला येऊन सर्वांनी, वाढवा दिवसाची या गोडी 

लाल लाल मेंदी, हिरवागार चुडा, __ रावांमुळे पडला जीवनात, प्रेमाचा सडा

सर्वांपुढे नमस्कारासाठी, जोडते दोन्ही हात, __रावांचे नाव घेते, पण सोडा माझी वाट