सुंदर रांगोळ्यांनी आणली, पंगतीला शोभा, __ला भरवतोय घास, सर्वांनी बघा
बघता बघता संसाराची __ वर्ष सरली, __च्या साथीने माझी, आनंदवेल बहरली
गरम गरम भाजीबरोबर, नरम नरम पाव, ___राव आहेत बरे, पण खातात खूपच भाव!
मोत्यांची माळ, सोन्याचा साज, ___ रावांचे नाव घेते, ___ आहे आज
माझ्या __ चा चेहरा, आहे खूपच हसरा, टेन्शन प्रॉब्लेम्स सगळे, क्षणामध्ये विसरा
दोन जीवांचे मिलन, जणू शतजन्मांच्या गाठी, __ रावांचे नाव घेते, तुमच्या आग्रहासाठी
निळ्या निळ्या आकाशात, चमचमतात तारे, __ च नाव घेतो, लक्ष द्या सारे
कामाची सुरूवात, होते श्रीगणेशापासून, ____चे नाव घ्यायला, सुरूवात केली आजपासून
देशभक्तांच्या त्यागामुळे, स्वराज्य हाती आले, ___शी लग्न करून, मनोरथ पूर्ण झाले
जात-धर्म असो कोणताही, लालच सर्वांचे रक्त, ___चे नाव घेतो, मी शिवरायांचा भक्त