वटपौर्णिमेच्या दिवशी, वडाला फेरे घालते सात, __रावांची लाभो मला, जन्मोजन्मी साथ
मंगळागौरीच्या दिनी जमला, मैत्रिणींचा मेळा, ___रावांचे नाव घेतले, आता मनसोक्त खेळा
श्रावणात बरसतात, सरींवर सरी, __ रावांचे नाव घेते __ ही बावरी
बाळाच्या हसऱ्या प्रवेशाने, आनंदले घर, ___रावांच्या संसारात, पडली नवी भर
मंगळसूत्र हाच, सौभाग्याचा दागिना खरा, ____रावांचे नाव घेऊन, जपते मराठी परंपरा
हिमालय पर्वतावर, शंकर-पार्वतीची जोडी, __रावांमुळे आली, आयुष्याला गोडी
अख्ख्या महाराष्ट्रात असं गाव नाही, जिथे माझ्या ___रावांचं नाव नाही !!
यंदा घातलाय आमच्या___च्या लग्नाचा घाट, उपस्थित राहून सर्वांनी, वाढवा शुभकार्याचा थाट
नवीन घरामध्ये, मन गेलं गांगरून, __रावांच्या मायेची, शाल घेते पांघरून
सुखी ठेवोत सर्वांना, ब्रम्हा, विष्णू आणि महेश, __ रावांचे नाव घेऊन, करते गृहप्रवेश