मुंबई ते पुणे, ३ तासांचं आहे अंतर, आधी खाऊन घेतो जरा, नावाचं बघू नंतर

उखाणे घेता घेता, सरली __वर्ष, __रावांना भेटल्याचा, मनी खूपच हर्ष!

गुलाबाचे फूल, वाऱ्यावर लागते डुलू, दिवसभर सुरु असते, ___ चे गुलूगुलू

सासरची मंडळी, आहेत खूपच हौशी, ___रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी 

प्रपोझ केलं देऊन, गुलाबाची फुलं, ___शी लग्न झालंय पण, एवढ्यात नाही हा मुलं!

मोगऱ्याच्या गजऱ्याचा, मस्त सुटलाय सुगंध, ___ सोबत मला मिळाला, जीवनाचा आनंद! 

एक होती चिऊ आणि एक होता काऊ, __ च नाव घेतो, डोकं नका खाऊ