Short & easy मजेशीर मराठी उखाणे | Funny / Comedy Marathi Ukhane

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो!

लग्न ठरल्यानंतर किंवा लग्नानंतर मित्रमंडळींना पार्टी तर द्यावीच लागणार! आणि मग तुम्हाला चिडवण्यासाठी खास उखाण्यांचा आग्रहही होणारच!

मग अशा मौजमजेच्या वातावरणात तुम्ही ते नेहमीचे Traditional आणि Serious उखाणे घेणार? अजिबात नाही. अशा वेळी उखाणेही हलके फुलकेच हवेत, सगळ्यांना हसवणारे. हो ना?

म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी १००% हशा पिकवणारे, कार्यक्रम / पार्टीची मजा वाढवणारे धमाल गंमतीदार उखाणे. सर्वांना पोट दुखेपर्यंत हसवा आणि रॉकस्टार बना.

लक्षात ठेवा, हे उखाणे मित्रमंडळी किंवा तुमच्या वयाच्या मनमिळाऊ नातेवाईकांसमोर घेण्यासाठी आहेत. लग्नासारख्या पारंपरिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये घेण्यासाठी मुळीच नाहीत.

आणि हो, तुमचा जोडीदार जर खूपच गंभीर स्वभावाचा असेल, तर त्याच्या परवानगीनेच हे उखाणे घ्या बरं का. नाहीतर मस्करीची कुस्करी व्हायची!

हे उखाणे कसे घ्याल?
अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच! आहे की नाही सोप्पं?

चला तर मग, उखाणे बघूया.

गरम गरम सांभर मध्ये, MDH चा मसाला, ___चे नाव घेताच, नेहमी येते हसायला

कडू कडू कारलं, सासूबाईला चारलं, ___रावांसोबत बघते, कटप्पाने बाहुबलीला का बरं मारलं?

टेरीकोटच्या शर्टाला, कॉटनचा खिसा, नाही ऐकणार जा सासूबाई, कितीही बोंबलत बसा

कोकणची ओळख, आहे हापूस आंबा, सासू माझी दिसते, सेम टू सेम जगदंबा

सोन्याच्या वाटीत, खोबऱ्याचा कीस, सुना आम्ही छान, आणि सासू ४२० 

आजोबा झालो तरी, मी अजूनही हिरो दिसतो, तुमच्या आजीकडे प्रेमाने, एक टक बघत बसतो

लाखात एक तिचे हसू, दिसते सुद्धा खूपच ढासू, ___ने बनवले finally, माझ्या आईला तिची सासू

डासामुळे होतो, डेंगू आणि मलेरिया, ___ला पहिल्यांदा बघताच, झाला मला लवेरिया

पालकाची भाजी २ दिवस, चिरून ठेवली तर सडते रे, ___ला फिरायला नाही नेले, तर ती लगेच रडते रे

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणता म्हणता, आज लग्नाचा दिवस आला, आधी होतो मोकाट, आता नुसते नियम पाळा