Short & easy मजेशीर मराठी उखाणे | Funny / Comedy Marathi Ukhane

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो!

लग्न ठरल्यानंतर किंवा लग्नानंतर मित्रमंडळींना पार्टी तर द्यावीच लागणार! आणि मग तुम्हाला चिडवण्यासाठी खास उखाण्यांचा आग्रहही होणारच!

मग अशा मौजमजेच्या वातावरणात तुम्ही ते नेहमीचे Traditional आणि Serious उखाणे घेणार? अजिबात नाही. अशा वेळी उखाणेही हलके फुलकेच हवेत, सगळ्यांना हसवणारे. हो ना?

म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी १००% हशा पिकवणारे, कार्यक्रम / पार्टीची मजा वाढवणारे धमाल गंमतीदार उखाणे. सर्वांना पोट दुखेपर्यंत हसवा आणि रॉकस्टार बना.

लक्षात ठेवा, हे उखाणे मित्रमंडळी किंवा तुमच्या वयाच्या मनमिळाऊ नातेवाईकांसमोर घेण्यासाठी आहेत. लग्नासारख्या पारंपरिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये घेण्यासाठी मुळीच नाहीत.

आणि हो, तुमचा जोडीदार जर खूपच गंभीर स्वभावाचा असेल, तर त्याच्या परवानगीनेच हे उखाणे घ्या बरं का. नाहीतर मस्करीची कुस्करी व्हायची!

हे उखाणे कसे घ्याल?
अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच! आहे की नाही सोप्पं?

चला तर मग, उखाणे बघूया.

तू पुण्याची मिसळ, मी मुंबईचा वडापाव, लग्नाला हो म्हणायला, ____ ने खाल्ला खूपच भाव

संसार असतो दोघांचा, दोघांनी तो सावरायचा, मी घातला पसारा तर, ___ने तो आवरायचा

सगळ्या भाज्यांमध्ये, कार्ले सगळ्यात कडू, ___  चे नातेवाईक पुष्कळ, कोणाकोणाच्या पाया पडू?

खरं प्रेम शोधता शोधता, झाल्या भरपुर चुका, ___चे नाव घेतो, द्या सगळयाजणी एक एक मुका

पाव शेर रवा, पाव शेर खवा, ___चे नाव घेते, आधी हजार रुपये ठेवा

शिडीवर शिडी, बत्तीस शिडी, ___राव ओढतात विडी, आणि मी लावते काडी

शिसवाचा पलंग, मखमलीची गादी अन मऊ मऊ उशी, मी गेले ___ रावांपाशी, तर राव म्हणतात आज एकादशी

लग्नात मागितला, हुंडा एक खोका, ___रावांचे नाव घेते. कुणीतरी ह्यांना दांडक्याने ठोका

बटाट्याला हिंदीमध्ये म्हणतात आलू, ___राव दिसतात साधे, पण आहेत खूप चालू

छान बनवतो नाक्यावरचा, अण्णा इडली डोसा, ___राव आहेत बिनकामी, आता त्यांना आयुष्यभर पोसा