हॅलो फ्रेंड्स!
लग्न ठरलं म्हटल्यावर घरच्यांची लगेचच, “आता उखाणे पाठ करा…नाहीतर लग्नात फजिती होईल हं” अशी अक्षरशः भुणभुण सुरु होते. त्यांचं पण बरोबरच आहे म्हणा… लग्न म्हटलं की उखाणे हे आलेच.
आता उखाणे घ्यायला नाही कोण म्हणतंय, पण नेहमीचे तेच तेच typical मराठी उखाणे किती कंटाळवाणे वाटतात हो, सगळ्यांनी वापरून वापरून रंग उडालेल्या कपड्यांसारखे.
सगळ्या समारंभांमध्ये अगदी न चुकता एकदा तरी ऐकले जातातच! हो ना? सगळ्यांनी ऐकलेले आणि सगळ्यांना तोंडपाठ! ना बोलणाऱ्याला मजा वाटते, ना ऐकणाऱ्याला रस.
आणि काही काही तर एवढे traditional की अगदी ‘काकूबाई स्टाईल’ चे किंवा आजी-आजोबांच्या काळातले वाटतात. हो ना ?
अहो बरोबरच आहे तुमचं. नवीन पिढी म्हटल्यावर उखाणेही नवीन नकोत का?
तेच तेच traditional उखाणे ऐकून कंटाळा आलाय? तुम्हालाही तुमच्या लग्नात, किंवा लग्नानंतरच्या समारंभांमध्ये काहीतरी हटके, काहीतरी नवीन, काहीतरी Unique करायचंय? मग सादर आहेत, आजच्या तरुण पिढीच्या Modern Lifestyle शी जुळणारे ताजे ताजे स्मार्ट उखाणे खास तुमच्यासाठीच!
हे उखाणे कसे घ्याल?
अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच! आहे की नाही सोप्पं?
चला तर मग, उखाणे बघूया.
चिकनच्या तंगडीला, तंदूरचा स्वाद,
___च्या प्रेमाचा, लागला मला नाद
Chicken chya tangadila, tandur cha swad,
___ chya premacha, lagla mala naad
साताऱ्याहून आणला, स्पेशल खवा,
___चा सहवास, मला रोज रोज हवा
Sataryahun aanla, special khawa,
___ cha sahwas, mala roj roj hawa
गरम गरम ब्रेड वर, वितळते जसे बटर,
___ला पाहताक्षणी, उघडले मनाचे शटर
Garam garam bread var, vitalate jase butter,
___ la pahatakshani, ughadle manache shutter
इंग्रजी भाषेत, चहाला म्हणतात Tea,
___चे नाव घेण्यास, लागते Double fee
Ingraji bhashet, chahala mhantat Tea,
___ che nav ghenyas, lagte Double fee
पुरवते सगळी हौस, न करता टाइम वेस्ट,
माझी सासू आहे भारी, सर्वांपेक्षा बेस्ट
Puravate sagli haus, n karta time waste,
Majhi saasu aahe bhaari, sarvanpeksha best
____च्या घरात, आता झालेय मी सेट,
माझ्याशी जुळवून घेणाऱ्या, सासूबाई खरंच ग्रेट
___ chya gharat, aata jhaley mi set,
Majhashi julvun ghennarya, sasu bai kharach great
वाट बघितली कितीतरी दिवस, दाद देईना कसली,
पण आज मात्र ___, माझ्या जाळ्यात फसली
Vaat baghitli kititari divas, daad deina kasli,
Pan aaj matra ___, majhya jalayat fasli
लोकलचा प्रवास करतो, फर्स्ट क्लास मध्ये बसून,
___ला पडली भूल, आली प्रेमात फसून
Local cha pravas karto, first-class madhe basun,
___la padli bhool, ali premat fasun
अंगणामध्ये चिमण्या, चिवचिवाट करतात,
___चे हट्ट पुरवताना, माझ्या नाकी नऊ येतात
लाखात एक तिचे हसू, दिसते सुद्धा खूपच ढासू,
___ने बनवले finally, माझ्या आईला तिची सासू