हॅलो फ्रेंड्स!

लग्न ठरलं म्हटल्यावर घरच्यांची लगेचच, “आता उखाणे पाठ करा…नाहीतर लग्नात फजिती होईल हं” अशी अक्षरशः भुणभुण सुरु होते. त्यांचं पण बरोबरच आहे म्हणा… लग्न म्हटलं की उखाणे  हे आलेच.

आता उखाणे घ्यायला नाही कोण म्हणतंय, पण नेहमीचे तेच तेच typical मराठी उखाणे किती कंटाळवाणे वाटतात हो, सगळ्यांनी वापरून वापरून रंग उडालेल्या कपड्यांसारखे.

सगळ्या समारंभांमध्ये अगदी न चुकता एकदा तरी ऐकले जातातच! हो ना? सगळ्यांनी ऐकलेले आणि सगळ्यांना तोंडपाठ! ना बोलणाऱ्याला मजा वाटते, ना ऐकणाऱ्याला रस.

आणि काही काही तर एवढे traditional की अगदी ‘काकूबाई स्टाईल’ चे  किंवा आजी-आजोबांच्या काळातले वाटतात. हो ना ?

अहो बरोबरच आहे तुमचं. नवीन पिढी म्हटल्यावर उखाणेही नवीन नकोत का?

तेच तेच traditional उखाणे ऐकून कंटाळा आलाय? तुम्हालाही तुमच्या लग्नात, किंवा लग्नानंतरच्या समारंभांमध्ये काहीतरी हटके, काहीतरी नवीन, काहीतरी Unique करायचंय? मग सादर आहेत, आजच्या तरुण पिढीच्या Modern Lifestyle शी जुळणारे ताजे ताजे स्मार्ट उखाणे खास तुमच्यासाठीच!
हे उखाणे कसे घ्याल?
अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच! आहे की नाही सोप्पं?

चला तर मग, उखाणे बघूया.

माझ्या __ चा चेहरा, आहे खूपच हसरा, टेन्शन प्रॉब्लेम्स सगळे, क्षणामध्ये विसरा Majhya ___cha chehra, ahe khoopach hasra, Tension problems sagle, kshanamadhye visra

जात-धर्म असो कोणताही, लालच सर्वांचे रक्त, ___चे नाव घेतो, मी शिवरायांचा भक्त  Jaat-dharm aso kontaahi, laalach sarvaanche rakt, ____ che naav gheto, mi Shivraayancha bhakt

मुंबई ते पुणे, ३ तासांचं आहे अंतर, आधी खाऊन घेतो जरा, नावाचं बघू नंतर Mumbai te Pune, 3 tasanch ahe antar, adhi khaun ghetto jara, naavach baghu nantar

प्रपोझ केलं देऊन, गुलाबाची फुलं, ___शी लग्न झालंय पण, एवढ्यात नाही हा मुलं! Propose kel deun, gulabachi phoola, ___shi lagna jhalay pan, evdhyat nahi ha mula!