हॅलो फ्रेंड्स!

लग्न ठरलं म्हटल्यावर घरच्यांची लगेचच, “आता उखाणे पाठ करा…नाहीतर लग्नात फजिती होईल हं” अशी अक्षरशः भुणभुण सुरु होते. त्यांचं पण बरोबरच आहे म्हणा… लग्न म्हटलं की उखाणे  हे आलेच.

आता उखाणे घ्यायला नाही कोण म्हणतंय, पण नेहमीचे तेच तेच typical मराठी उखाणे किती कंटाळवाणे वाटतात हो, सगळ्यांनी वापरून वापरून रंग उडालेल्या कपड्यांसारखे.

सगळ्या समारंभांमध्ये अगदी न चुकता एकदा तरी ऐकले जातातच! हो ना? सगळ्यांनी ऐकलेले आणि सगळ्यांना तोंडपाठ! ना बोलणाऱ्याला मजा वाटते, ना ऐकणाऱ्याला रस.

आणि काही काही तर एवढे traditional की अगदी ‘काकूबाई स्टाईल’ चे  किंवा आजी-आजोबांच्या काळातले वाटतात. हो ना ?

अहो बरोबरच आहे तुमचं. नवीन पिढी म्हटल्यावर उखाणेही नवीन नकोत का?

तेच तेच traditional उखाणे ऐकून कंटाळा आलाय? तुम्हालाही तुमच्या लग्नात, किंवा लग्नानंतरच्या समारंभांमध्ये काहीतरी हटके, काहीतरी नवीन, काहीतरी Unique करायचंय? मग सादर आहेत, आजच्या तरुण पिढीच्या Modern Lifestyle शी जुळणारे ताजे ताजे स्मार्ट उखाणे खास तुमच्यासाठीच!
हे उखाणे कसे घ्याल?
अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच! आहे की नाही सोप्पं?

चला तर मग, उखाणे बघूया.

उन्हामध्ये फिरून, skin झाली आहे tan, ___राव आहेत, माझे मोठे fan

घर असावं नेहमी, Clean and Neat, ___आहे माझी, Simple and Sweet

तांदुळाला इंग्लिशमध्ये, म्हणतात Rice, ___राव आहेत, माझी पहिली Choice

अंधश्रद्धेचा पाश, करी जीवनाचा नाश, ___चे नाव घेतो तुमच्यासाठी खास

डासामुळे होतो, डेंगू आणि मलेरिया, ___ला पहिल्यांदा बघताच, झाला मला लवेरिया

एकाच सोसायटीत राहून, झाले आमचे प्रेम, माझ्या नावापुढे अखेर, ___रावांचे लागले Surname

तिला बघताच 'दिल मे बजी घंटी', ___माझी बबली आणि मी तिचा बंटी

पालकाची भाजी २ दिवस, चिरून ठेवली तर सडते रे, ___ला फिरायला नाही नेले, तर ती लगेच रडते रे

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणता म्हणता, आज लग्नाचा दिवस आला, आधी होतो मोकाट, आता नुसते नियम पाळा