हॅलो फ्रेंड्स!

लग्न ठरलं म्हटल्यावर घरच्यांची लगेचच, “आता उखाणे पाठ करा…नाहीतर लग्नात फजिती होईल हं” अशी अक्षरशः भुणभुण सुरु होते. त्यांचं पण बरोबरच आहे म्हणा… लग्न म्हटलं की उखाणे  हे आलेच.

आता उखाणे घ्यायला नाही कोण म्हणतंय, पण नेहमीचे तेच तेच typical मराठी उखाणे किती कंटाळवाणे वाटतात हो, सगळ्यांनी वापरून वापरून रंग उडालेल्या कपड्यांसारखे.

सगळ्या समारंभांमध्ये अगदी न चुकता एकदा तरी ऐकले जातातच! हो ना? सगळ्यांनी ऐकलेले आणि सगळ्यांना तोंडपाठ! ना बोलणाऱ्याला मजा वाटते, ना ऐकणाऱ्याला रस.

आणि काही काही तर एवढे traditional की अगदी ‘काकूबाई स्टाईल’ चे  किंवा आजी-आजोबांच्या काळातले वाटतात. हो ना ?

अहो बरोबरच आहे तुमचं. नवीन पिढी म्हटल्यावर उखाणेही नवीन नकोत का?

तेच तेच traditional उखाणे ऐकून कंटाळा आलाय? तुम्हालाही तुमच्या लग्नात, किंवा लग्नानंतरच्या समारंभांमध्ये काहीतरी हटके, काहीतरी नवीन, काहीतरी Unique करायचंय? मग सादर आहेत, आजच्या तरुण पिढीच्या Modern Lifestyle शी जुळणारे ताजे ताजे स्मार्ट उखाणे खास तुमच्यासाठीच!
हे उखाणे कसे घ्याल?
अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच! आहे की नाही सोप्पं?

चला तर मग, उखाणे बघूया.

__च्या बाईक वर __ दिसतो एकदम फिट, बोलू दे लोकांना, आपण आपले जाऊ डबल सीट

पोळीचे नकाशे बनवणं, ही __ची कला, त्यानेही बनवल्या गोल तर, भाव कोण देणार मला?

मिळून काम केल्यावर, कामं होतात लवकर, मी चिरते भाजी, आणि __ लावतो कुकर

स्मार्ट Couple करते, कामांची वाटणी, मी करते इडल्या आणि, __वाटतो चटणी

लग्नासाठी Propose करायचं, मी केलं Daring , आता माझ्या जीवनाचं, ____च्याच हातात Steering

___ सोहळ्याला सर्वजण झाले, आनंदाने जॉईन, ___माझा हीरो, नी मी त्याची हिरॉईन

पाहताच___ला, जीव झाला वेडापीसा, तिच्या शॉपिंगच्या वेडापायी, रिकामा होतो माझा खिसा

उन्हाळ्यात हवा, गार गार ऊसाचा रस, __चाच विचार, माझ्या मनी रात्रंदिवस

खेळत होतो PUBG, आला ब्लू झोन, ___चं नाव घेतो, शोधून सेफ झोन