नमस्कार मैत्रिणींनो,
आधीच्या काळात नवऱ्याचं नाव न घेणं, अहो-जाओ करणं, उखाणा घेताना लाजेने चूर होणं हे खूपच सामान्य होतं. तो काळच तसा होता.

पण आत्ताचा काळ वेगळा आहे. बऱ्याच मुलींना वाटेल, ज्याला रोज नावानेच हाक मारतो, त्याचे नाव घेण्यासाठी खास उखाणा घ्यायची काय गरज? लाजणे तर दूरच राहिले. केवळ शास्त्र म्हणून या सगळ्या ‘outdated’ परंपरा पाळत राहायच्या का?

अगदी बरोबर आहे तुमचं. गरज खरंच काहीच नाही. पण तुम्ही उखाण्यांकडे केवळ एक प्रथा म्हणून न बघता वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलत तर?

आता हेच बघा ना… नेहमी एकेरी नाव ऐकण्याची सवय असणाऱ्या नवऱ्याला ‘राव’ ऐकण्याचे भाग्य फक्त उखाण्यामुळेच लाभते. हो ना? मग अधून-मधून त्याला जरा भाव दिला तर त्यात काय बिघडलं?

आणि उखाण्याच्या बहाण्याने मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना तुम्हाला चिडवण्याची आयती संधी मिळते ती वेगळीच. तेवढीच जरा गंमत आणि टाईमपाससुद्धा! वातावरणही जरा हलके-फुलके होते.

म्हणूनच उखाण्यांना एखादी कालबाह्य प्रथा समजून सोडून न देता, नवी फोडणी देऊन अजून रंगतदार बनवूया. काय? पटतंय ना?

चला तर मग बघूया, लग्नात तसेच लग्नानंतरही घेता येतील असे सोपे, सुंदर मस्त मराठी उखाणे.

 
हे उखाणे कसे घ्याल?
अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच! आहे की नाही सोप्पं?

चला तर मग, उखाणे बघूया.

उगवला सूर्य, मावळला शशी , ___रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी

बनारसी शालूला, आहेत जरतारी काठ, ___च्या मुलीच्या बारश्याचा, केला मोठा थाट

मोगऱ्याचा सुगंध, पावसाळ्यातील मृदगंध, __शी जुळले आता, रेशमी ऋणानुबंध 

हिरवाईचा शालू नेसून, येतो श्रावण महिना, ____रावच आहेत, माझा खरा दागिना

दारापुढे काढली, सुंदर रांगोळी फुलांची __च नाव घेते, सून मी __ची

सोन्याचे घुंगरू, चांदीच्या वाळा, सोनार घडवी दागिने, ___रावांच्या बाळा

आई ने केले संस्कार, बाबांनी केले सक्षम, __सोबत असताना, संसाराचा पाया होईल भक्कम

श्रावण महिना सुरु होताच, सणांची होते लगबग सुरु, ____राव आहेत इतके छान, कौतुक तरी किती करू?

आतून मऊ, पण बाहेर काटेरी साल, __दिसले खडूस तरी, मन मात्र विशाल

काऊ चिऊचे घास, प्रेमाने भरवायची आई, __मुळे कानी पडू लागली, परत नव्याने अंगाई