Short & easy हिंदू देवी-देवतांचे धार्मिक मराठी उखाणे । Best Marathi Ukhane based on Hindu Religion / Mythology / God-Goddess

 

नमस्कार!
सादर करत आहोत, खास धार्मिक स्त्री-पुरुषांसाठीचे पुराण व देव-देवतांवर आधारित पारंपारिक मराठी उखाणे

हे उखाणे कसे घ्याल?
अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच! आहे की नाही सोप्पं?

चला तर मग, उखाणे बघूया.

रामाने सीतेसाठी, उचलले शिवधनुष्य, ____रावांसाठी मागते, देवाकडे दीर्घायुष्य

रुक्मीणीने पण केला, कृष्णालाच वरीन,    __ रावांच्या साथीनं, आदर्श संसार करीन

वडाच्या झाडाला घातल्या, प्रदक्षिणा एकशे आठ, ____रावांसोबत बांधली, मी जन्मोजन्मीची गाठ 

मनाच्या गाभाऱ्यात, __ची मूर्ती, अशीच वाढत राहो देवा, __रावांची कीर्ती

कलियुगात अवतरली, सत्य व अहिंसेची मूर्ती,  __रावांची वाढो, सर्वदूर कीर्ती

___ची पूजा, मनोभावे करते, ___रावांसाठी, दीर्घायुष्य मागते

राधेला बघून, कृष्णाने वाजविली बासरी, __रावांच्या प्रेमामुळे, सुखाने नांदते सासरी

दशरथ राजाला, पुत्र होते चार, ____रावांनी घातला, मला मंगळसूत्राचा हार

गोकुळच्या वनात, कृष्ण वाजवितो बासरी, __रावांच्या प्रेमामुळे, सुखी आहे मी सासरी

पूजेच्या साहित्यात, उदबत्तीचा पुडा, ____रावांच्या नावाने, भरला सौभाग्याचा चुडा