Short & easy हिंदू देवी-देवतांचे धार्मिक मराठी उखाणे । Best Marathi Ukhane based on Hindu Religion / Mythology / God-Goddess

 

नमस्कार!
सादर करत आहोत, खास धार्मिक स्त्री-पुरुषांसाठीचे पुराण व देव-देवतांवर आधारित पारंपारिक मराठी उखाणे

हे उखाणे कसे घ्याल?
अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच! आहे की नाही सोप्पं?

चला तर मग, उखाणे बघूया.

कृष्णाच्या बासरीचा, राधेला लागला ध्यास , ___ला भरवितो मी, ___चा घास

लक्ष्मी शोभते दानाने, विद्या शोभते विनयाने, ___रावांच्या जीवावर, मी राहते मानाने

मंदिरात वाहते, फूल आणि पान, ___रावांचे नाव घेते, ठेऊन सर्वांचा मान

मंदिराचे वैभव, परमेश्वराची मूर्ती, ____रावांच्या संसारात, होवो इच्छापूर्ती

गणपती बाप्पा आहेत, शंकर-पार्वतीचे सुपुत्र, ___रावांनी घातले मला, सर्वांसमोर मंगळसूत्र

गणपतीपुळेचा beach, आहे छान फिरायला, ___राव जाऊ चला, गणपतीच्या दर्शनाला 

निर्मळ मंदिर, पवित्र मूर्ती, माझे प्रेम आहे, फक्त ___वरती

शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे काशीला, ____रावांचे नाव घेते, सगळे आहेत साक्षीला

रामदासांचा दासबोध, अनुभवाचा साठा , ___चे नाव घेतो, तुमचा मान मोठा  

नवग्रह मंडळात, शनीचं आहे वर्चस्व, ___आहे माझ्या, जीवनाचे सर्वस्व