Short & easy हिंदू देवी-देवतांचे धार्मिक मराठी उखाणे । Best Marathi Ukhane based on Hindu Religion / Mythology / God-Goddess

 

नमस्कार!
सादर करत आहोत, खास धार्मिक स्त्री-पुरुषांसाठीचे पुराण व देव-देवतांवर आधारित पारंपारिक मराठी उखाणे

हे उखाणे कसे घ्याल?
अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच! आहे की नाही सोप्पं?

चला तर मग, उखाणे बघूया.

नंदनवनात आहेत, अमृताचे कलश , ___माझी आहे, खूपच सालस

आम्हा दोघांची, स्वर्गात बांधली गाठ, _____रावांचे नाव मला, अगदी तोंडपाठ

सोन्याच्या कपावर, चांदीची बशी, __समोर फिक्या पडतील, रंभा आणि उर्वशी

__च्या दर्शनाला लागतात, लांबच लांब रांगा, __रावांचे नाव घ्यायला, मला कधीही सांगा 

देवापुढे लावली, समईची जोडी, ___रावांमुळे आली, आयुष्याला गोडी

दीन दुबळ्यांचे गाऱ्हाणे, परमेश्वरानी ऐकावे, ___रावांसारखे पती मिळाले, आणखी काय मागावे?

गोंडस बाळ व्हावे म्हणून, केला आम्ही नवस, ___ रावांच्या मुलीचा, आज बारश्याचा दिवस

देवघरात तेवतो, नंदादीप समाधानाचा, ___ रावांचे नाव घेऊन, आशीर्वाद मागते अखंड सौभाग्याचा

वटपौर्णिमेचे व्रत करते, सत्यवान-सावित्रीला स्मरून, ____रावांसाठी दीर्घायुष्य मागते, वडाला नमस्कार करून

सीतेसारखे चारित्र्य, रंभेसारखे रूप,  ___च्या सोबत, मी आनंदी आहे खूप