Short & easy हिंदू देवी-देवतांचे धार्मिक मराठी उखाणे । Best Marathi Ukhane based on Hindu Religion / Mythology / God-Goddess

 

नमस्कार!
सादर करत आहोत, खास धार्मिक स्त्री-पुरुषांसाठीचे पुराण व देव-देवतांवर आधारित पारंपारिक मराठी उखाणे

हे उखाणे कसे घ्याल?
अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच! आहे की नाही सोप्पं?

चला तर मग, उखाणे बघूया.

पतिव्रता सावित्रीपुढे, हार मानली यमाने, ____रावांचे नाव घेते, आदर व प्रेमाने

देवाच्या देव्हाऱ्यात, फुलांना प्रथम स्थान, ___ने दिला मला, पतिराजांचा मान

यमुनेच्या तीरावर, कृष्ण वाजवितो मुरली, __ आल्यापासून, सॅलरी कधी नाही पुरली

___ च्या आशीर्वादाने, आला भाग्याचा दिवस, ___रावांसाठी, मी केला होता नवस

पतिव्रता धर्माचा, सावित्री आहे आदर्श, ____ रावांचे नाव घेताना, होतो खूपच हर्ष

सायंकाळचे वेळी, नमस्कार करते देवाला, ___रावांचे नाव घेताना, आनंद होतो मनाला

श्रावणानंतर वाजतगाजत, येतात गौरी गणपती, ___राव आहेत, खूपच प्रेमळ पती

कण्वमुनींच्या आश्रमात, शकुंतलेचे माहेर, ___रावांनी दिला मला, सौभाग्याचा आहेर

सुख-समाधान असेल, तिथे लक्ष्मीचा वास, __रावांना देते, मी __चा घास

___च्या समोर, ठेवले केशरी पेढे, ___रावांचे  नाव घ्यायला, कसले हो आढे-वेढे ?