1
शिक्षणाचा मंत्र दिला, बाबासाहेबांनी सर्वांना,
___रावांचे नाव घेते, जय भीम म्हणताना
Shikshanacha mantra dila, Babasahebanni sarvanna,
___ ravanche naav ghete, Jai Bhim mhantana
2
जय भीमचा गजर, ऐकू येतो सर्वत्र,
___ चे मन आहे, प्रेमळ आणि पवित्र
Jai Bhim cha gajar, aiku yeto sarvatra,
___ che man aahe, premal ani Pavitra
3
बाबासाहेब आंबेडकर आहेत, भारतीय संविधानाचे शिल्पकार,
___ रावांसोबत करते, सर्वांना मनापासून नमस्कार
Babasaheb Ambedkar aahet, Bharatiya Samvidhanache shilpkar,
___ ravansobat karte, sarvanna manapasun namaskar
4
डॉ. बाबासाहेबांचे कार्य, प्रसिद्ध आहे जगभर,
___ रावांची लाभू दे देवा, साथ मला आयुष्यभर
Dr. Babasahebanche kaarya, prasiddh aahe jagbhar,
___ ravanchi labhu de deva, saath mala aayushyabhar
5
बाबासाहेबांचे विचार, देती सर्वांना प्रेरणा,
___ रावांना मिळो दीर्घायुष्य, हीच मनी कामना
Babasahebanche vichar, deti sarvanna prerana,
___ ravanna milo deerghayushya, hich mani kamna
6
जीवन जगावे, गौतम बुद्धांना अनुसरून,
___ रावांचे नाव घेते, बाबासाहेबांना नमस्कार करून
Jeevan jagave, Gautam Buddhanna anusrun,
___ ravanche naav ghete, Babasahebanna namaskar karun
7
बाबासाहेबांनी घातला, संविधानाचा पाया,
___ रावांवर राहो नेहमी, तुम्हा सर्वांची माया
Babasahebanni ghatla, Samvidhanacha paya,
___ ravanvar raho nehmi, tumha sarvanchi maya
8
दिन-दुबळ्यांना दिला, बाबासाहेबांनी आधार,
___ रावांसोबत करते, आनंदाने संसार
Din-dubalyanna dila, Babasahebanni aadhaar,
___ ravansobat karte, anandane sansar
9
वोडाफोन, एयरटेल पेक्षा, भारी आहे जिओ सिम,
___आणि माझ्याकडून सर्वांना, मानाचा जयभीम
Vodafone, Airtel peksha, bhaari aahe Jio SIM,
___ aani majhyakadun sarvanna, manacha Jai Bhim
10
जात-धर्म विसरूनी, घेतला समतेचा मार्ग,
___ रावांच्या प्रेमापुढे, फिका वाटे स्वर्ग
11
जय भीमचा नारा, रोमारोमांत वाहे,
___ रावांवर माझे, खूप प्रेम आहे
12
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत, भारत देशाची शान,
___रावांचे नाव घेते, ठेवून सर्वांचा मान
13
भगवान बुद्धांना पूजते, आणि बाबासाहेबांना करते मी वंदन,
___रावांसोबत जोडले मी, लग्नाचे पवित्र बंधन
Note: ___ च्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.
नमस्कार मंडळी!
तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !
आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!