जरी हाईट असली ___ची छोटी, तरी आहे ती, मनाने खूपच मोठी

असते नेहमी हसतमुख, बोलणे आहे गोड, ___च्या प्रीतीसाठी, मन घेते ओढ

तलावात उगवले, सुंदर कमळ, ___माझी, आहे खूपच प्रेमळ

मी नव्हते सुंदर, तरीही मला निवडले, ___रावांचे हेच रूप, मला फार आवडले

मोह नाही, माया नाही, नाही मत्सर वा हेवा, ___रावांचे नाव घेते, नीट लक्षात ठेवा

मस्त लागते आंबटगोड, संत्र्याची फोड, माझ्या ___ च बोलणं, मधापेक्षाही गोड

चांदीच्या कढईत, सोन्याचा झारा, ___चा स्वभाव, मला खूपच प्यारा

कोकिळेचा आवाज, वाटतो खूपच गोड , ___ला जपतो मी, जसा तळहाताचा फोड

नंदनवनात आहेत, अमृताचे कलश , ___माझी आहे, खूपच सालस

प्रेमाच्या ओलाव्याने, दुःखं कोरडी झाली, __माझ्या जीवनी, चांदणे शिंपीत आली