विद्येचा नसावा अभिमान, श्रीमंतीचा नसावा गर्व, __ रावांचे नाव घेते, ऐकताय ना सर्व?
चांदीच्या ताटात, __चे पेढे, __माझे हुशार, बाकी सगळे वेडे!
ताजमहाल बनवायला, कारागीर होते कुशल, __च नाव घेतो, तुमच्यासाठी स्पेशल
शिवरायांचे पराक्रम लिहायला, पुस्तकं पडतील कमी, ___ला सुखी ठेवण्याची, देतो मी हमी
प्रेमाला नसते मोजमाप, नसते लांबी रुंदी, आज भरवते__ला, गोड गोड बासुंदी
संसाराच्या गणिताचे, सुरु झाले पाढे, __च नाव घेऊन, भरवते मी पेढे!
संसाररुपी पुस्तकाचे, उघडले पहिले पान, __ रावांचे नाव घेते सर्वांचा राखून मान
आकाशाच्या पोटात, चंद्र, सूर्य, तारांगणे, __ च नाव घेतो, तुमच्या म्हणण्याप्रमाणे