गुलाबांचा ताटवा, लतांचा कुंज, ___रावांच्या बाळाची, आज आहे मुंज

आम्रवृक्षाच्या छायेत, कोकिळा करते गुंजन, ___सोबत करतो मी, ___ चे पूजन

निसर्गरूपी आकाशाला, सूर्यरूपी माळी, ___रावांचे नाव घेते, ___च्या वेळी

मोगऱ्याचा सुगंध, स्पर्धा करतो निशिगंधाशी, ___ चे नाव घेते, ___च्या दिवशी

फुलांइतकीच मोहक दिसते, गुलाबाची कळी, ___ रावांचे नाव घेते, ___च्या वेळी

हिमालय पर्वतावर, बर्फाच्या राशी, ___रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी

गावठी गुलाबाला येतो, अप्रतिम सुवास, ___रावांना भरवते, ___चा घास

निसर्गाचे सारे रंग, भरलेत तुझ्यात देवाने, ___ घरी आली, लक्ष्मी या रूपाने

पारिजताकाच्या झाडाखाली, हरीण घेते विसावा, ___रावांच्या पाठीशी, सदैव परमेश्वर असावा

फुलांच्या बागेत, फुलली मोहक शेवंती, ___राव सुखी राहावेत, हीच परमेश्वराला विनंती