पौर्णिमेचा चंद्र, आकाशात दिसतो साजिरा, ___वर शोभून दिसतो, सुगंधी मोगऱ्याचा गजरा
दोन शिंपल्यांच्या कुशीत, वाढतो टपोरा मोती, ___ची व माझी, अशीच राहो अखंड प्रीती
संध्याकाळच्या आकाशाचा, पिवळा-केशरी रंग, ___माझी नेहमी, घरकामात असते दंग
कोकिळेचा आवाज, वाटतो खूपच गोड , ___ला जपतो मी, जसा तळहाताचा फोड
करवंदाची साल, चंदनाचे खोड, ___रावांचे बोलणे, अमृतापेक्षा गोड
जंगलात जंगल, ताडोबाचं जंगल, __रावांच्या संसारात, सर्व राहो कुशल-मंगल
गुलाबाच्या फुलांपेक्षा, नाजूक दिसते शेवंती, __रावांना मिळो दीर्घायुष्य, हीच देवाला विनंती
आकाशात शोभतो, इंद्रधनुष्याचा पट्टा, __रावांचे नाव घेते, पुरे आता थट्टा
कळी हसली, फूल फुलले, मोहरून आला सुगंध, __रावांमुळे जीवनात, बहरून आलाय आनंद
जुईच्या वेलीवर लागली, सुगंधी नाजूक फुले, ___ ने दिली मला, दोन गोड मुले